लोणी धामणी -कामगार व उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून तसेच जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून आंबेगाव खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भगवान वाघ व ग्रामपंचायत पहाडदरा (ता.आंबेगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने 101 गरजू कटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे किराणा किट वाटप करण्यात आले.
अशी माहिती सरपंच राजश्री संतोष कुरकुटे यांनी दिली. यावेळी उपसरपंच सविता पिंगळे, व ग्रामस्थांच्या उपस्थितीत हे वाटप करण्यात आले. वाटप दरम्यान सामाजिक अंतर ठेवून व मास्क घालून सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन केले.