नवी दिल्ली – नायजेरियामध्ये लष्कराचे ड्रोन ( Drone acciden ) चुकून डागले गेल्यामुळे किमान ८५ जण ठार झाले आहेत. चूकून डागले गेलेले हे ड्रोन वायव्येकडील एका धार्मिक एकत्रीकरणावर पडले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अध्यक्ष मोय्यझ्झू यांनी या घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत. ( Nigeria news )
ड्रोन हल्ल्यामुळे मरण पावलेल्या ८५ जणांचे दफनविधी आतापर्यंत करण्यात आले आहेत. अजूनही काही जणांचे मृतदेह मिळणे बाकी आहेत. त्यांचा शोध सुरू आहे, असे नायजेरियाच्या नॅशनल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीने म्हटले आहे. मृतांमध्ये लहान मुले, महिला आणि काही ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. या शिवाय या ड्रोन हल्ल्यामध्ये किमान ६६ जण जखमी झाले आहेत, असेही एजन्सीने म्हटले आहे. ( drone strike in Nigeria )
हे सर्व जण मावलिद अल नबी नावाच्या धार्मिक उत्सवासाठी एकत्र जमले असताना हा ड्रोन हल्ला ( drone atack ) झाला होता. रविवारी संध्याकाळी झालेला हा ड्रोन हल्ला दहशतवादी आणि कंदुना प्रांतातील बंडखोरांना लक्ष्य करण्यासाठी करण्यात आला होता.
अशाप्रकारे लष्कराकडून झालेल्या चुकांमध्ये यापूर्वीही जीवितहानी झाली होती. २०१७ पासून लष्कराच्या हवाई हल्ल्यांमध्ये ४०० जण मारले गेले आहेत. हे हल्ले देशाच्या उत्तरेकडील सशस्त्र बंडखोरांना लक्ष्य करण्यासाठी केले गेले होते.