हांगजोऊ :- आशियाई क्रीडा 2023 स्पर्धेत रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले या भारतीय जोडीने टेनिस मिश्र दुहेरीची अंतिम फेरी गाठली आहे. यासह त्यांनी रौप्य पदक निश्चित केलं असलं तरी भारतीयांना दोघांकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.
शुक्रवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात रोहन बोपण्णा-ऋतुजा भोसले या जोडीने चायनीज तैपेईच्या चॅन हाओ चिंग आणि सू यू हसिऊ जोडीवर 6-1, 3-6, 10-4 अशी मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
दरम्यान,भारताने आशियाई क्रीडा 2023 स्पर्धेत आतापर्यंत(सहावा दिवस) 32 पदके पटकावून पदक तालिकेत चौथे स्थान पटकावले आहे. भारताने 8 सुवर्ण, 12 रौप्य आणि 12 कांस्य पदके जिंकली आहेत. भारताची सर्वाधिक पदके ही शुटिंगमधून आली आहेत.