नवी दिल्ली – एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी ब्रिटनमध्ये ऋषी सुनकच्या पंतप्रधान झाल्यावर प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे की, ‘इन्शाअल्लाह मला भविष्यात हिजाब घातलेली मुलगी भारताची पंतप्रधान झालेली पाहायला आवडेल नक्कीच एकेदिवस हिजाब घातलेली मुलगी भारताची पंतप्रधान होईल.’
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून देशभरात हिजाब बंदीसंदर्भात वाद सुरु आहे. तर दुसरीकडे भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर भारतासह जगभरात त्यांची चर्चा सुरु आहे. ऋषी सुनक यांच्यावरून भारतातील राजकारण अधिकच तापले आहे. अशातच खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी ऋषी सुनक यांच्या निमित्ताने सरकारवर हल्लाबोल केला आहे.
ओवेसी यांनी थेट पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करत सबका साथ, सबका विकास हा फक्त जुमला असल्याचे म्हटले आहे. जमिनीवरील वास्तव वेगळे आहे. असेही ते म्हणाले आहे.