भोपाळ – मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील मदर इंडिया कॉलनीमध्ये बुधवारी रात्री क्लोरीन वायू पसरल्याने खळबळ उडाली आहे. गॅस गळतीमुळे लोकांच्या डोळ्यात जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. याबाबत माहिती होताच संपूर्ण कॉलनीतील लोक घराबाहेर पडले. माहिती मिळताच भोपाळचे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त घटनास्थळी पोहोचले आहे.
परिसरातील जलशुद्धीकरण केंद्रात बसविण्यात आलेल्या क्लोरीन गॅसच्या सिलिंडरच्या नोझलमध्ये बिघाड झाल्याने गळती सुरू झाल्याचे पालिकेच्या पथकाला आढळून आले. सिलिंडरचे वजन सुमारे 900 किलो होते, ते तात्काळ महापालिकेच्या पथकाने पाण्यात टाकले आणि गॅस हवेत जाणे बंद केले.
यानंतर 5 किलो कॉस्टिक सोडा टाकून गॅस गळती बंद करण्यात आली. यादरम्यान परिसरातील 3 लोकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना हमीदिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. घटनेची माहिती मिळताच गॅस रिलीफ मंत्री विश्वास सारंग आणि भोपाळच्या महापौर मालती राय यांनी हमीदिया हॉस्पिटल गाठले आणि जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली. या घटनेनंतर आता खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवारी २७ ऑक्टोबरला बाधित भागात पाणीपुरवठा केला जाणार नाही.