पिंपरी, दि. 28 – दि पुणे लॉयर्स कन्झ्युमर्स को ऑपरेटिव्ह सोसायटीची संचालक पदाची निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये युनिट पॅनलच्या 14 तर परिवर्तन पॅनलच्या दोन सदस्यांची संचालक पदी निवड झाली. युनिटी पॅनलकडून महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशन पिंपरी-चिंचवड, खेड, मावळचे अध्यक्ष ऍड. अतिश लांडगे हे संचालक पदी विजयी झाले आहेत.
संचालक पदाच्या 16 जागांसाठी ही निवडणूक झाली. सर्वसाधारण गटामध्ये 11 संचालक आहेत. ऍड. हेमंत गुंड, ऍड.लक्ष्मण घुले, ऍड. आशिष ताम्हाणे, ऍड.सत्यजित तुपे, ऍड.सुनील बहिरट, ऍड. संजय बेंद्रे, ऍड. अतिश लांडगे, ऍड. कल्याण शिंदे, ऍड.शरद शेळके, ऍड. संजय पवार, ऍड.मनीष मगर. महिला राखीव गटातून ऍड.रेखा करंडे, ऍड. मोनिका वाडकर, विमुक्त जाती, भटक्या जमाती गटातून ऍड. गिरीराज गोफणे, इतर मागासवर्गीय गटातून ऍड. आलोक गायकवाड, अनुसूचित जाती-जमाती गटातून ऍड. विकास कांबळे विजयी झाले आहेत.
सोसायटीचे सुमारे सात हजार 500 सभासद आहेत. संचालक पदाच्या निवडणुकीत दोन हजार 985 सभासद वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला. बारामती, राजगुरूनगर आणि शिवाजीनगर येथील न्यायालयात मतदान केंद्र होती. दि पुणे लॉयर्स कन्झ्युमर्स को ऑपरेटिव्ह सोसायटी 65 वर्ष जुनी असून सोसायटीची वार्षिक उलाढाल 125 कोटी रुपये आहे.
पिंपरी-चिंचवड न्यायालयातील अनेक वकिलांनी दि पुणे लॉयर्स कन्झ्युमर्स को ऑपरेटिव्ह सोसायटीची निवडणूक लढवली. मात्र यात कोणालाही यश मिळाले नाही. ऍड. अतिश लांडगे हे पिंपरी-चिंचवड न्यायालयातील पहिले वकील सोसायटीच्या संचालक पदी निवडून गेले आहेत.
आगामी काळात नेहरूनगर येथील न्यायालयात दि पुणे लॉयर्स कन्झ्युमर्स को ऑपरेटिव्ह सोसायटीची सेवा वकील बांधवांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. राजगुरुनगर न्यायालयात सोसायटी काउंटर, तसेच ई फायलींग, स्टॅम्प विक्री, स्टेशनरी, केस लॉ सॉफ्टवेअर, नवीन वकिलांना सोसायटी सभासद करून घेण्यासाठी प्रयत्नशिल राहणार आहे.
ऍड. अतिश लांडगे
संचालक
दि पुणे लॉयर्स कन्झ्युमर्स को ऑपरेटिव्ह सोसायटी