No Entry 2 Film| बॉलीवूड अभिनेता सलमान खान, अनिल कपूर आणि फरदीन खान यांचा ‘नो एंट्री’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. 2005 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉलिवूडच्या सुपरहिट कॉमेडी चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता.
काही दिवसांपूर्वी निर्माते बोनी कपूर यांनी एका मुलाखतीदरम्यान ‘नो एण्ट्री’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली होती. या चित्रपटाच्या सिक्वेलवर अनेक वर्षांपासून काम सुरू आहे आणि त्यात अनेक कास्टिंग बदल करण्यात आले आहेत. ‘नो एंट्री 2’मध्ये वरुण धवन, अर्जुन कपूर आणि दिलजीत दोसांझसारखे स्टार्स दिसणार आहेत. तर अनिल कपूर, सलमान खान आणि फरदीन खानचा पत्ता कट झाल्याचं समजत आहे.
दरम्यान, या चित्रपटातील मुख्य अभिनेत्रींबाबत एक नवीन अपडेट देखील समोर आले आहे, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखीच वाढली आहे. “या वर्षाच्या अखेरीस डिसेंबरपर्यंत ‘नो एण्ट्री 2’ चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात करणार आहोत. यात वरुण धवन, अर्जुन कपूर, दिलजीत दोसांझ हे मुख्य भूमिकेत असणार आहेत. त्यासोबतच या चित्रपटात 10 अभिनेत्रीही असणार आहेत”, असे बोनी कपूर यांनी सांगितले होते. आता यातील 3 अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. No Entry 2 Film|
मानुषी छिल्लर या चित्रपटात दिसणार असल्याचे म्हंटले जात आहे. ‘ऑपरेशन व्हॅलेंटाइन’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि पीरियड-ड्रामा ‘सम्राट पृथ्वीराज’ यांसारख्या ॲक्शन चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर, मानुषी एका कॉमेडी चित्रपटात काम करण्यासाठी सज्ज झाली आहे. मानुषी छिल्लर, श्रद्धा कपूर आणि क्रिती सेनन 2005 मध्ये आलेल्या ‘नो एंट्री’ या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. पण अद्याप याबद्दलची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. No Entry 2 Film|
दरम्यान, ‘नो एण्ट्री’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केले होते. तर या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनी केली होती. या चित्रपटात सलमान खान, अनिल कपूर, फरदीन खान, बिपाशा बासू, ईशा देओल, लारा दत्ता, सेलिना जेटली आणि बोमन ईरानी हे कलाकार पाहायला मिळाले होते. आता दुसऱ्या भागात आणखी नवे कलाकार कोण असणार हे देखील पहावे लागणार आहे.
हेही वाचा:
“मोठे भाऊही म्हणता अन्….सरडा तरी वेळाने रंग बदलतो” ; बच्चू कडूंची राणांवर सडकून टीका