Arvind Kejriwal Insulin Injection । दिल्ली सरकारच्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात अरविंद केजरीवाल अटकेत आहेत. दरम्यान, त्यांच्या आरोग्याच्या समस्यांवरून आणि इन्सुलिनवरून सुरू झालेला वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये. इन्सुलिनसाठी केजरीवाल यांना न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला होता. अनेकवेळा मागणी केल्यानंतर अखेर केजरीवाल यांना इन्सुलिन देण्यात आलं. अरविंद केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण ३२० वर पोहोचलं होतं. त्यामुळे त्यांना इन्सुलिन देण्यात आलंय.
रक्तातील साखरेचं प्रमाण ३२० पर्यंत गेलं Arvind Kejriwal Insulin Injection ।
अरविंद केजरीवाल यांना मधुमेहाचा गंभीर त्रास असून आप नेत्यांनी दावा केला होता की, तुरुंगात डांबल्यापासून केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण वाढलंय. त्यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण ३२० पर्यंत गेलंय. त्याचबरोबर त्यांचं वजनदेखील घटलं. त्यानंतर केजरीवाल यांनी इन्सुलिनची मागणी केली होती. त्यानुसार सोमवारी त्यांना इन्सुलिन देण्यात आलं. तत्पुर्वी केजरीवाल यांना औषधं आणि इन्सुलिन दिलं जात नसल्याने आप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं.
केजरीवाल यांच्या तब्येतीवरून मोठा गोंधळ Arvind Kejriwal Insulin Injection ।
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या तब्येतीवरून, डाएटवरून गेल्या काही दिवसांपासून मोठा गोंधळ चालू आहे. एका बाजूला आप नेते आरोप करत आहेत की, अरविंद केजरीवाल यांचा तुरुंगात छळ होत आहे. त्यांना त्यांचे कुटुंबीय आणि इतर सहकाऱ्यांना समोरासमोर भेटू दिलं जात नाही. त्यांना उच्च मधुमेहाचा (हाय डायबिटीस) त्रास असून तुरुंगात रवानगी झाल्यापासून केजरीवाल यांचं वजनदेखील झपाट्याने कमी होतं आहे. केजरीवाल यांना त्यांची नेहमीची औषधंदेखील दिली जात नसल्याचा आरोप आपने केला आहे.
त्यासोबतच केजरीवाल यांनी तुरुंग अधीक्षकांना पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी म्हटलं होतं की, “तुमची वर्तमानपत्रातील प्रतिक्रिया वाचून मला वाईट वाटलं. तुम्ही म्हणालात की, मी कधीही इन्सुलिनचा मुद्दा उपस्थित केला नाही. मात्र हे संपूर्णपणे खोटं आहे. मी दररोज हा मुद्दा उपस्थित करतोय. माझ्य इन्सुलिनची आठवण करून देतोय. माझी शुगर वाढली आहे. मी ग्लुको मीटरही डॉक्टरांना दाखवलं. माझी शुगर लेव्हल २५० ते ३२० पर्यंत वाढली आहे तर फास्टिंग शुगर १६० ते २०० च्या पातळीवर जातं आहे.”