घोडेगाव, (वार्ताहर) – घोडेगाव (ता.आंबेगाव) येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कार्यरत असणारे कलाशिक्षक समीर मुजावर यांची कला शिक्षक संगीत व कार्यानुभव अध्यापक संघाद्वारे पुणे जिल्हा कला शिक्षक पुरस्कार, २०२४ साठी निवड करण्यात आली आहे.
समीर मुजावर यांची नुकतीच आंबेगाव तालुका कला अध्यापक संघाच्या उपाध्यक्षपदी निवड देखील झाली आहे. मुजावर यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून आपली वेगळीच छाप निर्माण केली असून उत्तम व आदर्श कला शिक्षक म्हणून त्यांचा लौकिक आहे.
त्यांच्या या उपलब्धीसाठी आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष तुकाराम काळे, विद्यालयाचे अध्यक्ष बाळासाहेब काळे, तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक व सल्लागार यांनी समीर मुजावर यांचे अभिनंदन केले.
विद्यालयाच्या प्राचार्या मेरीफ्लोरा डिसोजा, उपप्राचार्या रेखा आवारी, पर्यवेक्षिका वंदना वायकर, विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद,पालक व विद्यार्थी यांनी देखील मुजावर यांचे अभिनंदन केले. बुधवार, दि. ३ रोजी डी. वाय. पाटील सभागृह, आकुर्डी येथे यथोचित सन्मानासह मुजावर यांना जिल्हा कला शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.