पुणे – पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगवरचा तसेच पुणे-सोलापूर रस्त्यावरील भैरोबानाला येथील उड्डाणपूल होण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी संरक्षण विभाग व कॅन्टोंन्मेंट विभागाच्या हद्दीतील जागांचे भूसंपादन तातडीनं करण्याचे आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे.
या दोन्ही पूलांचे काम तातडीन मार्गी लागावे या मागणीसाठी तसेच कामांचा आढावा घेण्यासाठी कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी तातडीनं बैठक घेण्याची मागणी विभागीय आयुक्तांकडे केली होती.
बैठकीला पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल तसेच संरक्षण विभागाचे अधिकारी, रेल्वे विभागाचे अधिकारी, पुणे मनपाचे मुख्य अभियंता बोनाला साहेब, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी या दोन्ही पुलांच्या कामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेत नियोजित वेळेत काम पूर्ण करावे याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच त्यासाठी कृतीशील कार्यक्रम ठराविण्याचा निर्णयही घेण्यात आला.