मुंबई – बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा एकापाठोपाठ एक चित्रपटांची घोषणा करत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने रोहित धवन दिग्दर्शित “शहजादा’या चित्रपटाची घोषणा केली होती. तेव्हा पासूनच फॅन्स या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. “शहजादा’ चित्रपटात कार्तिक आर्यन सोबत अभिनेत्री क्रिती सेनन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘अला वैकुंठपुरमुलु’ या चित्रपटाचा हिंदी व्हर्जन असणार आहे.
दरम्यान, प्रदर्शनापूर्वीच गुरुवारी या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. ‘शहजादा’ पाहिल्यानंतर आता अभिनेता अर्जुन कपूरने या चित्रपटाचे कौतुक केले आहे. अर्जुन कपूरने त्याच्या इंस्टाग्रामवर या चित्रपटाविषयी रिव्ह्यू दिला आहे. अर्जुनने कार्तिक आर्यनच्या ‘शेहजादा’ या कॉमेडी चित्रपटाचे वर्णन फुल पैसा वसुल असे केले आहे.
‘शहजादा’च्या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये अभिनेता वरुण धवन, हुमा कुरेशी, पत्रलेखा, शाहिद कपूर आणि मीरा राजपूत, जरीन खान आणि अली असगर यांच्यासह अनेक स्टार्स पोहोचले होते. या चित्रपटातील स्टारकास्ट क्रिती, कार्तिक, रोनित आणि अंकुर यांच्या मुलांनी त्यांच्या कुटुंबियांसह चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली होती.
‘शेहजादा’ चित्रपटाचे दिग्दर्शन वरुण धवनचा भाऊ आणि चित्रपट दिग्दर्शक डेव्हिड धवनचा मुलगा रोहित धवनने केलं आहे. यापूर्वी रोहितने 2016 मधील ‘ढिशूम’ आणि 2011 मध्ये आलेला ‘देसी बॉईज’ चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ‘शेहजादा’ चित्रपटाला 17 फेब्रुवारी 2023 ला सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे.