करोना संसर्गाचा वेग थोडा मंदावल्याने पुन्हा एकदा भारतातील जवळपास सर्व पर्यटन स्थळे पुन्हा खुली झाल्याने मोठ्या संख्येने पर्यटक त्यांच्या आवडत्या ठिकाणांना भेट देण्यासाठी जात आहेत. प्रवास करताना प्रत्येकाची पसंती वेगवेगळी असते. एखाद्याला हिल स्टेशनवर फिरायला आवडते, तर कोणी साहसी खेळ असलेले ठिकाण निवडतात, त्यातही ‘बंजी जम्पिंग’ चे नाव खूप येते.
‘बंजी जम्पिंग’ या सहासप्रकारात वेगळीच मजा आहे. जर तुम्हालाही या साहसाचा आनंद घ्यायचा असेल आणि याचा आनंद घेण्यासाठी कुठे जायचे असा प्रश्न पडत असेल? तर आम्ही तुम्हाला काही अद्भुत ठिकाणांबद्दल सांगू. तत्पूर्वी बंजी जम्पिंग म्हणजे काय, हे जाणून घेऊया.
बंजी जम्पिंग या कृती मध्ये एका लांब लवचिक दोऱ्याला बांधून उंच भागावरून उडी मारली जाते. उंच भागामध्ये इमारत, पुल किंवा क्रेन अशा स्थिर वस्तूंचा समावेश होतो. किंवा हॉट एअर बलुन आणि हेलिकॉप्टर अशा जमीनीच्यावर, आकाशात हलणाऱ्या अस्थिर वस्तूंचाही वापर करू शकतो. फ्री फॉलिंग आणि रिबाउंडमुळे अधिकच रोमांचक प्रसंग अनुभवता येतात. जेव्हा व्यक्ती उडी मारतो तेव्हा ती लवचिक दोरी ताणली जाते आणि उडी मारणारा पुन्हा वरच्या बाजूला ओढला जातो कारण दोरी कायनेटिक ऊर्जा संपेपर्यंत वर आणि खाली हेलकावे खाते.
पहिली आधुनिक बंजी जंप ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी डेंजरस स्पोर्ट्स क्लबच्या डेविड कर्क आणि सिमॉन किलिंग या दोन सदस्यांकडून १ एप्रिल १९७९ मध्ये ब्रिस्टॉलमधील क्लीफटॉन सस्पेन्शन ब्रिजवरून २५० फूट (७६सेंटीमीटर ) वरून केली गेली. या दोघं उद्या मारणाऱ्यांना नंतर अटक केली गेली, परंतू त्यांनी यु. एस. मध्ये गोल्डन गेट ब्रिज आणि रॉयल जॉर्ज ब्रिज वरून उडी मारणे सुरु ठेवले आणि जगभरात ही संकल्पना पसरवली.