मुंबई – आराध्या बच्चनचा प्रत्येक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर दिसताच व्हायरल होतो. बी-टाऊनची पार्टी असो किंवा तिचा कोणताही सामान्य व्हिडिओ, आराध्या आपल्या सौंदर्याने लोकांचे लक्ष वेधून घेते. आता आराध्याचा एक असाच व्हिडिओ समोर आला आहे, ज्याला पाहिल्यानंतर लोक तिचे खूप कौतुक करत आहेत.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची मुलगी आराध्या ही एक लोकप्रिय स्टार किड आहे.चाहत्यांमध्ये आराध्याचे स्टारडम एखाद्या मोठ्या स्टारपेक्षा कमी नाही. त्यामुळे तिच्याबाबतच्या अनेक गोष्टी चाहत्यांना जाणून घ्यायच्या असतात. यामुळेच आराध्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. तिच्या निरागसतेने पुन्हा एकदा लोकांची मने जिंकली आहेत.
16 नोव्हेंबर 2011 रोजी जन्मलेली आराध्या 11 वर्षांची आहे. ती मुंबईतील प्रसिद्ध धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकते. अनेक नामवंतांची मुले या शाळेत शिकतात. व्हायरल व्हिडिओमध्ये आराध्याने आपल्या हातात एक वाद्य पकडल्याचे दिसून येते. शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची ती तयारी करत आहे. व्हिडिओमध्ये आराध्या तिच्या मैत्रिणींसोबत दिसत आहे.
View this post on Instagram
हा व्हिडिओ एका फॅन पेजने शेअर केला आहे.यावेळी चाहते तिच्या निरागसतेचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. “ती खूप गोंडस आहे, तिचे डोळे सुंदर आहेत आणि निरागस हास्य आहे अशा अनेक कमेंट चाहत्यांनी तिच्या व्हिडिओवर केल्या आहेत.