पिंपरी (प्रतिनिधी) – महसूलवाढ व वीजबिल वसूलीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल खराळवाडी कार्यालयातील भूजंग बाबर यांचा यांचा संचालक (संचालन) अरविंद भादिकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपविभाग कार्यालयांचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिलीप मदने (वडगाव शेरी), सचिन पाटील (गणेशखिंड) रामचंद्र लोंढे (फायरब्रिगेड), उमेश कवडे (पेशवेपार्क), भूजंग बाबर (खराळवाडी) तसेच सहायक अभियंता भरत पवार (कॅम्प शाखा), जनमित्र देविदास शिंदे, मंगेश घोडे व उमाकांत ढोले यांचादेखील सत्कार करण्यात आला.
रास्तापेठ येथील ‘प्रकाशदूत’ सभागृहात रविवारी (दि.31) संचालक श्री. भादिकर यांनी पुणे परिमंडलमधील वीजबिलांच्या थकबाकीसह इतर विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, युवराज जरग, संजीव राठोड, संजीव नेहेते, सहायक महाव्यवस्थापक माधुरी राऊत उपस्थित होते.
यावेळी अरविंद भादिकर म्हणाले की, एकीकडे विजेची मागणी व वीजवापर वाढत आहे. त्याच प्रमाणात महसूलवाढ देखील होणे आवश्यक आहे. यासह प्रामुख्याने औद्योगिकसह इतर सर्व वर्गवारीतील ग्राहकांना आणखी तात्काळ व उत्कृष्ट सेवा देण्यासाठी प्रत्येक विभाग कार्यालयाने नियोजनाचा व अंमलबजावणीचा कृती आराखडा तयार करावा. येत्या काही दिवसांत या नियोजनाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.