काबूल – महिलांच्या विद्यापिठांमधील शिक्षणावरील बंदीपाठोपाठ तालिबानने आता महिलांना देशांतर्गत आणि विदेशी स्वयंसेवी संघटनांमध्ये काम करण्यास देखील बंदी घातली आहे. यामुळे या “एनजीओ’मध्ये काम करण्याची संधी महिलांना यापुढे मिळणार नाही.
अफगाणिस्तानमधील अर्थ मंत्री कारी दिन हनिफ यांनी सर्व “एनजीओं’ना एक पत्र पाठवून हे आदेश दिले आहेत. ज्या “एनजीओ’ या आदेशांचे पालन करणार नाहीत, त्यांना अफगाणिस्तानमध्ये काम करण्याची परवानगी मिळणार नाही, असे या पत्रामध्ये म्हटलेले आहे. अर्थ मंत्रालयाचा प्रवक्ता अब्दुल हबिब याच्या हवाल्याने वृत्तसंस्थेने या आदेशाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.