टोकिओ – जपानमधील बुलेट ट्रेनमध्ये हल्ला करण्याचा आणखीन एक प्रयत्न आज फसला. जपानच्या नैऋत्येकडील भागात बुलेट ट्रेनमध्ये आग लावण्याऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हिरोशिमा ते कागोशिमा दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनमध्ये एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असताना पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या ट्रेनमध्ये धूर येऊ लागल्याचे लक्षात आले होते. ही आग लागली तेंव्हा ही बुलेट ट्रेन कुमानमोतो भागातून जात होती. त्यानंतर पोलिसांनी 69 वर्षीय व्यक्तीला फुकुओका भागातून ताब्यात घेतले.
या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. आठवड्याभरापूर्वीच 31 ऑक्टोबरला टोकियोमध्ये रेल्वेत नागरिकांवर चाकू हल्ला झाला होता. त्यानंतर या हल्लेखोराने रेल्वेतील आसनांवर ज्वालाग्रही पदार्थ टाकला होता.
त्यामुळे रेल्वेतील आसनांचे नुकसान झाले होते. त्यापूर्वी काही महिन्यांपूर्वी आणखीन एका व्यक्तीने ट्रेनमध्ये असाच प्रकारे चाकू हल्ला केला होता. आनंदी महिलांना लक्ष्य करण्यासाठी त्याने हा चाकू हल्ला केला होता, असे समजते आहे.