- भोसरीतील दोघांचा मृत्यू
- 285 जणांना डिस्चार्ज
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज 633 नवीन रुग्णांची भर पडली. आजपर्यंत शहरातील 1 लाख 10 हजार 703 जणांना करोनाची लागण झाली आहे.पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, आज चार वाजेपर्यंत शहरातील 633 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. दिवसभरात दोन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये भोसरीतील 54 व 59 वर्षीय दोन पुरुषांचा समावेश आहे.
आज दिवसभरामध्ये 285 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 3 हजार 517 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 2593 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 1226 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 1299 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 4024 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 5323 इतकी आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील भोसरी रुग्णालय परिसरामध्ये गेल्या पाच दिवसांपासून रुग्णसंख्या वाढत आहे. असे असताना आज यमुनानगर परिसरात देखील बाधितांची संख्या वाढली आहे. भोसरीमध्ये 121 तर यमुनानगर परिसरामध्ये 113 रुग्णांची नोंद झाली. तसेच पिंपरीतील जिजामाता रुग्णालय हद्दीत 66 रुग्ण आढळले आहेत. तसेच आकुर्डी 57, सांगवी 92, तालेरा 86, थेरगाव 56, यमुनानगर 113 व वायसीएम रुग्णालयामध्ये 42 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आज दिवसभरामध्ये 5022 जणांना लस देण्यात आली.