- 105 जणांना डिस्चार्ज
- 2 जणांचा मृत्यू
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज दिवसभरात 151 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 105 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. शहरामध्ये आजपर्यंत 97326 जणांना करोनाची लागण झाली आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, बुधवारी दुपारी चार वाजेपर्यंत शहरातील 151 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील एकाही रुग्णाची आज नोंद झाली नाही. तसेच आज दिवसभरात शहरातील 2 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. आज शहरातील पिंपळे सौदागर व थेरगाव येथील दोघांचा मृत्यू झाला. आजपर्यंत 2501 इतक्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 1766 तर शहराबाहेरील 735 रुग्णांचा समावेश आहे.
आज दिवसभरात 105 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 93843 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 3564 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 2401 रुग्णांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 686 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 968 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 1654 इतकी आहे.
जिल्हा रुग्णालयात 9 जणांची प्रकृती चिंताजनक
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात बुधवारी (दि. 6) नव्याने 3 करोनाबाधित रुग्ण आढळले. रुग्णालयामध्ये सध्या 30 जणांवर उपचार सुरू आहे. त्यातील 9 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
रुग्णालयामध्ये 2 महिला व एक पुरुष रुग्णाच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. औंध, नवी सांगवी येथील हे रहिवाशी आहेत. रुग्णालयात आत्तापर्यंत एकूण 1 हजार 848 रुग्ण करोनाबाधित आढळले आहेत. त्यातील 682 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, 161 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 675 रुग्णांना होम क्वारंटाइन केले आहे. 304 रुग्णांना उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलविले आहे.