चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून सहा प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका

वडगाव मावळ – पुणे जिल्हा परिषदेच्या 14 वित्त आयोगाच्या निधीतून मावळ तालुक्‍यातील 6 प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्यात आल्या असून, शुक्रवारी (दि. 25) विधानभवन पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आला.

या वेळी राज्यमंत्री दत्ता भरणे, दिलीप वळसे पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजीत शिवतारे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, सभापती प्रमोद काकडे, पूजा पारगे, सारिका पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार, उपकार्यकारी अधिकारी पंचायत संदीप कोहिनकर, आढळे बुद्रुकचे सरपंच विश्‍वास घोटकुले आदी उपस्थित होते.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर मावळ तालुक्‍यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णवाहिका अत्यावश्‍यक असल्याने कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर यांच्या पाठपुराव्यानंतर तळेगाव दाभाडे, खडकाळा, आढळे बुद्रुक, टाकवे बुद्रुक, कार्ला व येळसे या प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत.

एका रुग्णवाहिकेचा खर्च 15 लाख 42 हजार रुपये आहे. करोनाच्या काळात प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका मिळाल्याने डॉक्‍टर, कर्मचारी व नागरिकांनी समाधान व्यक्‍त केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.