गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगणारा जेरबंद

पुणे- गावठी बनावटीचे पिस्तूल व काडतूस बाळगणाऱ्यास कोंढवा पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली. त्याच्या विरुध्द कोंढवा पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल रमेश चव्हाण ( रा. अंबिकानगर , अप्पर बिबवेवाडी) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार तपास पथकातील पोलीस आंमलदार आदर्श चव्हाण यास माहिती मिळाली की पठाण चौक, काकडे वस्ती ,कोंढवा बुद्रुक येथे एक व्यक्ती स्वतःजवळ पिस्टूल बाळगून फिरत आहे. त्यानूसार पोलीस हवालदार संतोष नाईक पोलीस नाईक निलेश वनवे, अमित साळुंखे, संजीव कळंबे ,पोलीस शिपाई आदर्शॅं चव्हाण, ज्योतिबा पवार, किशोर वळे यांच्यासह सापळा रचून अनिल रमेश चव्हाण यास ताब्यात घेतले.

त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे एक पिस्टूल व दोन जिवंत काडतुसे मिळुन आली. त्याच्यावर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायदा कलम- 3(25) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे . ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त (पुर्व) नामदेव चव्हाण, उपायुक्तस सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त कल्यानराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड , पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस ठाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे यांच्या पथकाने केली आहे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.