‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ सर्वेक्षणाला एनसीसी, एनएसएसच्या विद्यार्थ्यांची साथ

Madhuvan

 

कोल्हापूर- माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत सुरु असलेल्या सर्वेक्षणाला एनसीसी आणि एनएसएसच्या विदयार्थ्यांची साथ मिळाल्याने कोरोना प्रतिबंधासाठीची मोहिम अधिक गतीमान होण्यास निश्तिपणे मदत होईल असा विश्वास आयुक्त डॉ.मल्लिनाथ्‍ कलशेटटी यांनी व्यक्त केला.

महानगरपालिकेच्या राजारामपूरी येथील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेतील सर्वेक्षणसाठी आरोग्य कर्मचारी आणि शिक्षकांच्या बरोबरीने शहाजी कॉलेजच्यावतीने एनएसएस आणि एनसीसी विदयार्थ्यांचे पथक उपलब्ध करुन दिले असून या उपक्रमाची सुरुवात आज आयुक्त डॉ.मल्लिनाथ्‍ कलशेटटी व उपमहापौर संजय मोहिते यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी परिवहन समिती सभापती सौ.प्रतिज्ञा उत्तुरे, नगरसेविका सौ.भाग्यश्री शेटके, वैदयकिय अधिकारी शोभा दाभाडे, शहाजी कॉलेजचे प्राध्यापक रमेश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेव्दारे महापालिका क्षेत्रातील जवळपास 5 लाख 61 हजार 325 लोकांपर्यंत घरोघरी जाऊन ताप आणि ऑक्सिजन लेव्हल तपासण्याबरेाबरच लोकांसाठी आरोग्य शिक्षणाचा महत्वपुर्ण कार्यक्रम महापालिकेने हाती घेतला असून या उपक्रमास शहरवासियांकडून उर्त्स्फुत प्रतिसाद मिळत असल्याबददल आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी समाधान व्यक्त केले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम मोहिमेअंतर्गत्‍ घरी येणाऱ्या स्वयंसेवक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना नागरीकांनी खरीखुरी माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेतून शहरातील एकही व्यक्ती वंचित राहणार नाही, असे नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रारंभी वैदयकिय अधिकारी शोभा दाभाडे यांनी स्वागत करुन या नाविन्यपुर्ण उपक्रमाची माहिती दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.