देशात मद्यविक्रीवर मुभा, मात्र…

नवी दिल्ली – जगात कोरोनाने चांगलाच थैमान घातला आहे. देशांमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 2 लाख 39 हजार पार पोहोचली आहे. यातच करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी लॉकडाउनची घोषणा केली होती. लॉकडाउनदरम्यान दोन्ही टप्प्यात मद्यविक्रीवर बंदी होती. मात्र ४ मे पासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या टप्यात मद्यविक्रीला सशर्त परवाना देण्यात आला आहे.

४ मे पासून सुरू होणाऱ्या लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात ग्रीन व आरेंज क्षेत्रांमध्ये केशकर्तनालये आणि सलून उघडण्यास परवानगी दिली आहे. तसेच तिन्ही क्षेत्रांत मद्यविक्रीस मुभा देण्यात आल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केले. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं योग्य पालन केलं तर मद्यविक्रीची दुकानं सुरु केली जाऊ शकतात असे संकेत दिले होते.

तत्पूर्वी, राज्यासह देशभरात दारू दुकानं-वाईन शॉप सुरु ठेवण्याची मागणी केली जात होती लॉकडाऊनमध्ये काही किराणा आणि अन्य दुकानांना सशर्त परवानगी दिली असली, तरी मद्य आणि वाईन दुकानांवर बंदी कायम असेल, असे काही दिवसांपूर्वी केंद्राने स्पष्ट केले होते. याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून महसुलासाठी वाईन शॉप सुरु करण्याचा विचार व्यक्त केला होता. मात्र यावर आता केंद्रानेच स्पष्टीकरण देत, देशभरातील दारू दुकाने बंदच राहतील, असे म्हटले आहे. यामुळे वॉईन शॉप सुरू होण्याच्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.