मेलबर्न : ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स परिसरामध्ये अतिशय विचित्र अशी अंडी सापडली आहेत या अंड्यामध्ये एलियन सदृश प्राणी असून त्या अंड्यामध्ये असणारा पदार्थही अतिशय विषारी आणि प्राणघातक असल्याचे समजते न्यू साउथ वेल्स परिसरामध्ये सापांचा शोध घेणाऱ्या एका समूहाला हि अंडी आढळली.
या अंड्यामध्ये विचित्र आकाराचे साप असतील अशी शक्यता आहे या अंड्यामध्ये सापडणाऱ्या सापांचे विष अतिशय प्राणघातक असून जर मानवी शरीरात ते गेले तर माणसाला त्वरित हृदयविकाराचा झटका येऊन माणसाचा मृत्यू होतो असे तज्ञांनी सांगितले आहे या अंड्यामध्ये सापडणारा पातळ पदार्थ ही अतिशय विषारी आहे ईस्टर्न ब्राऊन नावाच्या अतिशय विषारी अशा सापाची ही अंडी असून हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा विषारी साप मानला जातो या सापाचा आकार आणि शरीरयष्टी एलियन प्रमाणे असल्यामुळेच त्याची दहशत आहे.
या भागात सापांचे काम करणाऱ्या या समूहाला या प्रकारातली 23 अंडी सापडली पण तज्ञांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या 23 पैकी फक्त सहा अंड्यामधूनच सापाचा जन्म होऊ शकतो मार्च महिन्याच्या आसपास या अंड्यांमधून साप बाहेर येऊ शकतात ईस्टर्न ब्राऊन जातीचा हा साप अंडी दिल्यानंतर निघून जातो सापाची पिल्ले बाहेर आल्यावर ते आपली काळजी स्वतः घेतात.
हे साप अतिशय विषारी असल्यामुळे त्यांचे आपोआपच संरक्षण होते हा साप इतर सापप्रमाणेच लांब असला तरी त्याचे तोंड मात्र एखाद्या एलियन प्रमाणे जाड आणि विचित्र आकाराचे असते त्यामुळे या सापाला एलियन सदृश प्राण्याचे उपमा देण्यात आली आहे.