बेल्हे (वार्ताहर): आळे (ता.जुन्नर) या ठिकाणी मंगळवार (दि.१६) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून अंदाजे १ हजार २०० किलो मांस जप्त करण्यात आले. तसेच तीन गाईंची सुटका करण्यात आली. पंधरा दिवसांपूर्वीच याच ठिकाणी अशाच प्रकारची कारवाई आळेफाटा पोलिसांनी केली होती. गेल्या पंधरा दिवसात ही दुसरी कारवाई झाल्याने आळेफाटा पोलिसांच्या दबंगगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आळेफाटा पोलिस ठाण्याचा हद्दीत असलेल्या आळे गावातील दोघेजण त्यांच्या आळे गावामधील घराजवळून पिक अप गाडी ( क्र एम एच -०४ जे यू ३२९) मधून अंदाजे एकहजार किलो मांस विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची खबर आळेफाटा पोलिसांना मिळाली होती.
या माहितीवरुन आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक टी.वाय. मुजावर आणि त्यांच्या सहका-यांनी छापा टाकला त्यामध्ये त्यांना अंदाजे एक टन मांस विक्रीसाठी जाण्याच्या तयारीत असलेले आढळून आले.तसेच यात ३ गाई होत्या गाईंना पंजरपोळ येथे पाठवण्यात आले आहे.
पोलिसांनी पकडलेले मांस व पिक अप गाडीचा पंचनामा केला असून या प्रकरणी आळेफाटा पोलिस ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पकडलेले मांस गोमांस असल्याचा अंदाज आहे. पिकप आळेफाटा पोलिसांत जमा करण्यात आले आहे.
पंधरा ते सोळा दिवसांपूर्वीच आळेगावात आळेफाटा पोलिसांनी छापा टाकून अंदाजे साडेपाचशे किलो गोमांस जप्त करुन कत्तलीसाठी आनलेल्या आठ जनावरांची सुटका केली होती. पंधरा दिवसात ही दुसरी कारवाई झाल्याने आळेफाटा पोलिसांच्या दबंगगीरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुढील तपास आळेफाटा पोलिस करत आहे.