मुंबई – अक्षय कुमार एक कॉमेडी ऍक्शन अभिनेता असला तरी सोशल मीडियावर तो चांगल्याच पोस्ट शेअर करत असतो. इतर अभिनेते किंवा अभिनेत्रींनप्रमाणे अक्षही कधी खोटी पब्लिसिटी करताना दिसत नाही. सध्या सोशल मीडियावर अक्षय कुमारकडे २५० कोटींचे प्रायव्हेट जेट असल्याची पोस्ट व्हायरल होत होती. खरतर एवढा मोठा अभिनेता असल्यामुळे अनेकांना हे खरंही वाटू शकत. परंतु अक्षयने स्वतः याबाबत खुलासा केला आहे.
कॅनडाच नागरीकत्व स्वीकारलेला अक्षय कुमार आपल्या बऱ्याचशा चित्रपटांचे शूटिंग विदेशातच करतो. वर्षाला कमीतकमी ५ चित्रपट करणाऱ्या अक्षयकडे प्रायव्हेट जेट असू शकत असं सगळ्यांना वाटण साहजिक आहे. अक्षय कुमारने व्हायरल झालेली ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत याबाबत खुलासा केला आहे. ट्विट करत अक्षय कुमार म्हणतो,”लायर लायर पेंट ऑन फायर. लहानपणी हे ऐकलं होत पण खरंच काही लोक अजून मोठे नाही झालेत आणि मी त्यांना सोडून देण्याच्या मूडमध्ये आजिबात नाही. माझ्याबाबत आधार नसलेल्या काहीही गोष्टी लिहिणार तर मी उत्तर देणार”. अक्षय कुमारच्या या पोस्टवरून हे तर निश्चित झाले आहे की अक्षयकडे २५० कोटींचे प्रायव्हेट जेट आहे ही एक अफवा आहे.
Liar, Liar…pants on fire! Heard this in childhood? Well, some people have clearly not grown up, and I’m just not in a mood to let them get away with it. Write baseless lies about me, and I’ll call it out. Here, a Pants on Fire (POF) gem for you. 👇#POFbyAK pic.twitter.com/TMIEhdV3f6
— Akshay Kumar (@akshaykumar) October 16, 2022
या रक्षाबंधनाला अक्षय कुमारचा रक्षाबंधन चित्रपट थिएटरमध्ये दाखल झाला होता. अक्षयचा चित्रपट आमिर खानच्या लाल सिंग चड्डासोबत स्पर्धा करताना दिसला होता. मात्र आता अक्षयच्या ‘राम सेतू’ या चित्रपटाची सर्वांना प्रतीक्षा आहे. या चित्रपटाची पहिली झलक सर्वांना चांगलीच आवडल्यामुळे रहस्यमयी ‘राम सेतू’ची सर्वांना प्रतीक्षा आहे.