Lok Sabha Election 2024| लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव उतरले आहेत. यावेळी ते कन्नौजमधून निवडणूक लढवणार आहेत. 2019 मध्ये अखिलेश आझमगडमधून निवडणूक लढले होते. यंदा ते कन्नौजमधून निवडणूक लढवणार असल्याने आज गुरुवारी दुपारी 12 वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कन्नौज ही जागा भाजप आणि इतर समाजवादी पक्षासाठी पुन्हा एकदा चिंतेचा मुद्दा बनली आहे.
तेज प्रताप यादव यांचा पत्ता कट Lok Sabha Election 2024|
भाजपचे सुब्रत पाठक यांनी 2019 च्या निवडणुकीत अखिलेश यांच्या पत्नी डिंपल यादव यांचा पराभव केला. त्यानंतर सुब्रत पाठक यांना भाजपकडून पुन्हा संधी देण्यात आली आहे. समाजवादी पार्टीने अखिलेश यादव यांचा आपला पुतण्या तेज प्रताप यादव यांना या जागेवरून उमेदवारी जाहीर केली होती.
मात्र, कन्नौजमधील समाजवादी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची नाराजी आणि जागा गमावण्याची शक्यता पाहता अखिलेश यादव यांनी स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आता अखिलेश यादव यांचा सामना सुब्रत पाठक यांच्याशी होणार आहे.
अखिलेश यादव कन्नौजमधून तीन वेळा खासदार Lok Sabha Election 2024|
कन्नौज अनेक शतकांपासून परफ्यूम उद्योगात अग्रेसर आहे आणि परफ्यूम हा येथील अर्थव्यवस्थेचा कणा आहे. अखिलेश याआधीही या जागेवरून लोकसभेचे खासदार राहिले आहेत. 2012 मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी ते कन्नौजमधून तीन वेळा खासदार होते. अखिलेश यांनी 2000 साली या जागेवरून आपली राजकीय खेळी सुरू केली होती. वडील मुलायम सिंह यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेवरून अखिलेश यांनी पोटनिवडणूक लढवली होती आणि विजय मिळवला होता.
मुलायम यांनी 1999 मध्ये कन्नौज आणि संभल मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. नंतर त्यांनी कन्नौजचा राजीनामा दिला आणि मुलगा अखिलेशसाठी जागा सोडली. पोटनिवडणूक जिंकल्यानंतर अखिलेश 2004 आणि 2009 मध्येही कन्नौजमधून खासदार म्हणून निवडून आले. 2012 मध्ये अखिलेश यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर कन्नौज लोकसभा खासदारकीचा राजीनामा दिला.
डिंपल यादव कन्नौजमधून दोनदा खासदार
अखिलेश यांच्या पत्नी डिंपल यादव यांनीही पोटनिवडणुकीत विजय मिळवला. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेत डिंपल यादव कन्नौजमधून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र, 2019 च्या निवडणुकीत डिंपल आणि यादव कुटुंबाला मोठा फटका बसला. सपा-बसपा-आरएलडीची युती असूनही डिंपल यांना यश मिळाले नाही आणि भाजपचे स्थानिक नेते सुब्रत पाठक यांनी येथे विजय मिळवला. त्यानंतर आता 2024 मध्ये सुब्रत पाठक यांच्याविरोधात अखिलेश यादव पुन्हा रिंगणात उतरले आहेत.
हेही वाचा:
बिहारमध्ये जेडीयू नेते सौरभ कुमार यांची गोळ्या झाडून हत्या ; नागरिकांकडून पाटणा-गया रस्तारोको