एअर इंडियाच्या विमानात गोंधळ करणाऱ्या महिलेचा मृत्यू

लंडन – दारू पिऊन विमानात गोंधळ घालणाऱ्या सिमोन बर्न्स या महिलेचा इंग्लंडमध्ये मृत्यू झाला आहे. मागच्या वर्षी तिने एअर इंडियाच्या विमानात गोंधळ घातला होता. सिमोन बर्न्सने केबिन क्रू ला शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर थुंकली होती. एअर इंडियाच्या विमानातील वर्तणुकीबद्दल तिला सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. नुकतीच तिची तुरुंगातून सुटका झाली होती.

एअर इंडियाच्या मुंबई-लंडन विमानात ही घटना घडली होती. सिमोन बर्न्स पेशाने मानवी हक्कांसाठी लढणारी वकील होती. विमानातील क्रू ने तिला दारु द्यायला नकार दिल्यानंतर तिचा पारा चढला. तिने क्रू मेंबर्सना शिवीगाळ केली होती. विमानातील क्रू ने तिला आधीच वाईनच्या तीन बाटल्या दिल्या होत्या. त्यामुळे तीला अजून दारू देण्यास क्रू ने नकार दिला होता.

सिमोन बर्न्स बिझनेस क्‍लासमधून प्रवास करत होती. दारु नाकारल्यानंतर केब्रिन क्रू ला शिवीगाळ करताना तिने भारतीयांबद्दलही अनेक अपशब्द उच्चारले होते. विमानातील पुरुष क्रू सदस्यावर ती थुंकली सुद्धा होती. तिचे हे सर्व वर्तन कॅमेऱ्यामध्ये कैद झाले होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.