राहाता- राहात्यातील व्ही.स्टार मार्शल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत चमकदार कामगिरी करत १८ पदके पटकावली. यात पाच विद्यार्थ्यांची पुणे विभागासाठी तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती कराटे प्रशिक्षक विजय मोगले यांनी दिली.
जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन दि. ६ ते ८ डिसेंबर या काळात करण्यात आले होते. यात १४, १७ व १९ वर्षे खालील मुले व मुलींच्या शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये राहाता येथील व्ही. स्टार मार्शल आर्ट कराटे असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्या ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी तब्बल १४ तालुक्यातून जिल्हास्तरावर १ हजार मुलांनी सहभाग नोंदवला होता. ५ गोल्ड ८ सिल्वर, ५ ब्रांच असे १८ पदक राहात्यातील विद्यार्थ्यांनी मिळविले. यामध्ये ५ विद्यार्थ्यांची पुणे विभागासाठी निवड झाली. यामध्ये प्राची निमसे, खुशी पावटे, आशिष प्रभुणे, साई निमसे, ईश्वरी गुंजाळ या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
१४ वर्ष गटामध्ये : खुशी पावटे गोल्ड , हर्षल मोगले सिल्वर,
श्रेया बारवे ब्रांझ , शलक शेट्टी ब्रांझ ,साई निमसे गोल्ड, आशिष प्रभूणे गोल्ड , ईश्वरी गुंजाळ गोल्ड , सई लांडबिले सिल्वर , तेजस्विनी बाबुळखे सिल्वर, श्रृती सोनुळे सिल्वर, अभिनव गिरगावे सिल्वर, साहिल वाघमारे सिल्वर, कल्पेश वाघमारे ब्राँस, वैष्णवी वाघमारे ब्राँझ. १९ वर्ष गटामध्ये: प्राची निमसे गोल्ड, श्रावणी निमसे सिल्वर ,वैभवी पुंड सिल्वर , राणी खेत्रे ब्रांझे असे पदक या विद्यार्थ्यांनी पटकावले आहे. या विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक विजय मोगले, अनिल सोमवंशी, भावना निमसे व शालेय क्रीडा शिक्षक, मुख्याध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.