श्रीरामपूर – येथील फोटोग्राफर नानासाहेब रंगनाथ चोंडके हे रेल्वेने दि. २ रोजी मध्यरात्री रेल्वेस्थानकावरून उतरून घरी अतिथी कॉलनीत पायी जात असताना तहसील कार्यालयासमोर दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून १३ हजार रुपये व ११ हजार ५०० रुपयांचा मोबाईल लुटून नेला होता.
या प्रकरणी पोलिसांनी खालीद बिबन शेख (वय २८, रा. कृष्णविहार साइट, प्रभाग १) व बाबर जब्बार पठाण (वय २४, रा. हुसेननगर, प्रभाग १) यांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली ८५ हजार रुपये किमतीची दुचाकी व चोरी गेलेला ऐवजा ताब्यात घेण्यात आला आहे. श्रीरामपूर पोलिस तपास करत आहेत.