जवळा – जामखेडची ज्वारी तिची चव न्यारी, पांढरी शुभ्र भाकरी व पचण्यास हलकी असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जामखेडची ज्वारी प्रसिद्ध आहे. जामखेड तालुक्यात यावर्षी चाळीस हजार हेक्टरवर ज्वारीचा पेरा आहे. सध्या ज्वारीची पिके हुरडा अवस्थेत असल्याने हुरडा पार्टी शेत शिवारात दिसू लागल्या आहेत.
ज्वारीचे उत्पादने बागायती व कोरडवाहू क्षेत्रात येणारे उत्तम दर्जाचे पीक आहे. ज्वारीपासून जनावरांस कडबा उपलब्ध होत आहे. जामखेड तालुक्यात ज्वारीचे वाण दगडी, बेद्रे, जूट, सफेदगंगा व कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना अधिक उत्पादन देणारे फुले रेवती, सुचित्रा, मालदांडी इत्यादी बियाणे दिले जाते जातात.
जामखेड तालुक्यात यावर्षी चाळीस हजार हेक्टरवर ज्वारीचा पेरा आहे. सध्या ज्वारीची पिके हुरडा अवस्थेत असल्याने हुरडा पार्टी शेत शिवारात दिसू लागल्या आहेत. जामखेडची ज्वारी या नावाने व्यापारी पुणे, मुंबई मोठ्या शहरांमध्ये मॉलमध्ये विकू लागले आहेत. ज्वारीची भाकर ही गरिबांची ओळखली जायची. आता मात्र ही ज्वारीची भाकरी श्रीमंतांच्या ताटात दिसू लागली आहे.
ज्वारी चार हजार रुपये क्विंंटलपेक्षा जास्त कधीच विकलेली जात नव्हती. आता मात्र मागील वर्षापासून ज्वारीचे बाजार भाव दर्जानुसार चार हजार ते सात हजार रुपये क्विंटलपर्यंत गेले आहे. यामुळे यावर्षी शेतकऱ्यांचा ज्वारीच्या उत्पादन घेण्याचा कल दिसून येत आहे.