अहमदनगर – संगमनेर तालुक्यातील कोठे खुर्द गावात विहीरीत आई आणि तीन चिमुकल्यांचा मृतदेह आढळलल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कोठे खुर्द गाव परिसरात असलेल्या खांडगेदरा येथे बाळासाहेब गणपत ढोकरे, व पत्नी स्वाती बाळासाहेब ढोकरे, हे आपल्या दोन मुली आणि एका वर्षाच्या मुलासोबत राहत होते. मात्र, आज स्वाती ढोकने यांच्यासह तीन चिमुकल्यांचे मृतदेह आढळून आले. या घटनेने अहमदनगर जिल्हा हादरला आहे.
घटनेची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत नागरिकांच्या मदतीने चारही मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. या घटनेने कोठे खुर्द गावावर शोककळा पसरली असून नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. हि सामूहिक आत्महत्या आहे की हत्या याचा तपास पोलीस करत आहे. दरम्यान, कालच राहुरीच्या देवळाली प्रवरा येथे बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह गावातील बारव मध्ये आढळून आला होता.