पिंपरी, (प्रतिनिधी) – उद्योजकांच्या हितासाठी पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटना सातत्याने कार्यरत आहे. संघटनेने केलेल्या आंदोलनांना यशही येत आहे, असे मत पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी व्यक्त केले. संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी संघटना कार्यालय सद्गुरू प्लाझा थर्मेक्स चौक चिंचवड येथे पार पडली. वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी संदीप बेलसरे यांची अध्यक्ष म्हणून सार्वानुमते निवड करण्यात आली आणि त्यांच्या अध्यक्षते खाली अत्यंत खेळी मेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली.
संघटनेने गेल्या दोन वर्षात केलेल्या कामाचा आढावा संघटनेचे सचिव जयंत कड यांनी घेतला. संघटनेने लघुउद्योजकांना वाढीव आलेल्या वीज बिलासाठी महावितरण कार्यालय भोसरी येथे आंदोलन करून वीज बिलाची होळी करण्यात आली. तसेच उद्योग मंत्री उदयजी सामंत व भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांचेकडे शास्तीकर सरसकट माफीसाठी सतत पाठपुरावा करून आमदार भोसरी यांचेमार्फत विधिमंडळात शास्तीकर सरसकट माफ करून घेतला. महावितरण भोसरी डिव्हिजनचे तीन सब डिव्हिजनमध्ये विभाजन करण्यात आले.
खजिनदार संजय ववले यांनी सन २०२२-२३ व २०२३-२४ या दोन वर्षाचा ताळेबंद वाचून सभेत मांडला व तो सर्वानुमते मंजूर कण्यात आला. वार्षिक सर्वसाधारण सभेला मार्गदर्शन करताना अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी सांगितले की, संघटनेत नवीन सभासद वाढविण्याकरिता सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. तसेच ज्या भागातील सदस्यांना काही समस्या असल्यास त्या भागातील संचालकांनी व इतर संचालकांच्या माध्यमातून समस्या सोडविण्याकरिता मदत करण्यात येइल.
वार्षिक सर्वसाधारण सभेस उपाध्यक्ष – संजय जगताप, विनोद नाणेकर, संचालक- संजय सातव, नवनाथ वायाळ, प्रवीण लोंढे, प्रमोद राणे, सचिन आदक तसेच स्वीकृत संचालक- तात्या सपकाळ, माणिक पडवळ, संजय भोसले, श्रीपती खुणे, सुरेश गवस, नरेंद्र निकम, प्रमोद दिवटे, अजय लोखंडे, गौरंग बनकर, गणेश खेडकर व संघटनेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.