मुंबई – अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोलची लेक न्यासा देवगण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. न्यासा सध्या आपले शिक्षण पूर्ण करत असल्यामुळे सिनेमांपासून लांब आहे. असं असल तरी न्यासा नेहमीच बॉलिवूड पार्ट्यांमध्ये दिसून येते. स्टार किड्सच्या यादीत आर्यन खान नंतर सर्वात चर्चेत देखील न्यासाचं नाव असत. आता देखील न्यासा तिच्या पार्टी लूकमुळे पुन्हा चर्चेत आली आहे.
बॉलिवूडमध्ये सध्या खिसमस माहोल असल्यामुळे अनेक स्टार्स पार्ट्यांमध्ये व्यस्त असल्याचे दिसून येते. न्यासाचा देखील ख्रिसमस पार्टीमधून बाहेर पडल्यानंतरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. यावेळी न्यासा आपल्या मित्राच्या हातात हात घालून मीडियापासून दूर जाताना दिसून येते. यावेळी न्यासाने परिधान केलेल्या पिंक ड्रेसमध्ये तिचा लूक अतिशय बोल्ड वाटत आहे.
View this post on Instagram
न्यासाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी जोरदार कमेंटबाजी केली आहे. अनेकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केल्याचे देखील आईवेळी पाहायला मिळते. न्यासा देवगण लवकरच आपला बॉलिवूड डेब्यू करेल अशा चर्चा काही दिवसांपूर्वी सुरु होत्या. परंतु अभिनेत्री काजोलने ती अद्याप आपले शिक्षण पूर्ण करणार असलयाचे सांगत बोलीववूड डेब्यूच्या बातम्यांना पूर्ण विराम दिला.