मुंबई – काजोल तिच्या व्यस्त शेड्युलमध्ये अनेकदा स्वतःसाठी वेळ काढते. आणि कुटुंबासोबत क्वालिटी टाइम स्पेंड करते. सध्या ती राजस्थानमधील जावई लेपर्ड सफारीचा आनंद घेत आहे. येथे तिने खूप एन्जॉय केले आणि तिच्या सुंदर क्षणांची झलक इंस्टाग्रामवर शेअर केली.यावेळी तिच्यासोबत तिचा मुलगा युग देखील होता.
काजोलला फिरण्याची आवड आहे आणि ती नेहमी तिच्या कुटुंबासोबत फिरायला जाते.सध्या ती राजस्थानच्या टूरवर असलयाचे समजते. यावेळी काजोलने सन राईज पासून ते सनसेट पर्यंतच्या आपल्या प्रवासाचा व्हिडीओ इंस्टावर शेअर केला आहे. ज्यामध्ये सुंदर निसर्गासह विविध प्राणी देखील जंगलात दिसून येत आहेत. यासोबतच व्हिडिओमध्ये मुलगा युग देखील टेकड्यांवर बसलेला दिसत आहे. या व्हिडिओसोबत काजोलने कॅप्शन दिले आहे, ‘एक असा हॉलिडे जिथे आम्ही शोचे स्टार नव्हतो…’
View this post on Instagram
मोठ्या पडद्यापासून काजोल दूर असली तरी सोशल मीडियावर ती चांगलीच चर्चेत असते. कामाव्यतिरिक्त कुटुंबियांसोबत तिला क्वालीटी वेळ घालवायला खूप आवडते. काजोल शेवटची ‘त्रिभंगा’मध्ये दिसली होती. आता लवकरच ती ‘सलाम वेंकी’मध्ये दिसणार आहे.