अखेर अभिनेत्री पूजा हेगडेचे ‘ते’ स्वप्न पूर्ण? पोस्ट व्हायरल…

बॉलीवूड अभिनेत्री पूजा हेगडेचे एक अपूर्ण असलेले स्वप्न आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचे स्वप्न आता लवकरच सत्यात उतरणार आहे. पूजाने सोशल मीडियावर अमिताभ यांच्यासोबतचा एक कॅंडिड फोटो शेअर करत चाहत्यांशी आपला आनंद शेअर केला आहे.

या फोटोमध्ये अमिताभ बच्चन हे फॉर्मल लूकमध्ये दिसत आहे. तर पूजा ही कॅजुअल आउटफिटमध्ये मोहक अंदाजात हसताना दिसत आहे. पूजा हेगडेने एका सोशल मीडियावरील “ऑस्क मी एनीथिंग सेशन’मध्ये एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना अमिताभ बच्चन हे तिचे ड्रिम ऍक्‍टर असल्याचे सांगितले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Hegde (@hegdepooja)

तसेच एका चाहत्याला दिलेल्या उत्तरात पूजा म्हणाली होती की, मी फक्‍त आणि फक्‍त एकदाच अमिताभ बच्चन सरांसोबत काम करू इच्छित आहे. मला आशा आहे की, एक दिवस हे स्वप्न नक्‍की पूर्ण होईल.

दरम्यान, पूजाचे हे स्वप्न आता पूर्ण होत आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास ती थालापती विजयसोबत “बीस्ट’, चिरंजीवी आणि राम चरणसह “आचार्य’, प्रभाससोबत “राधे श्‍याम’ आणि सलमान खानसेबत “भाईजान’मध्ये झळकलेली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.