बॉलीवूड अभिनेता आफताब शिवदासानी याची पत्नी निन दुसांजने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. हे दोघजण पहिल्या मुलाचे पालक झाले आहेत. दोघांनीही आपल्या पहिल्या मुलीचा आनंद व्यक्त केला आहे. आफताब आणि निन हे 2014 मध्ये एका खासगी सोहळ्यात विवाहबंधनात अडकले होते.
आफताब शिवदासानी आणि निन दुसांज यांच्यातील एक मनोरंजक गोष्ट अशी आहे की या जोडप्याने 2017मध्ये श्रीलंकेत तीन वर्षानंतर पुन्हा एकदा मोठ्या उत्साहाने लग्न केले होते. या लग्नात दोघांच्या कुटुंबातील सदस्यांसह जवळचे मित्रही उपस्थित होते. हा विवाहसोहळा दोन दिवस रंगला होता.
दरम्यान, आफताब शिवदासानीने 1999मध्ये “मस्त’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. यानंतर त्याने “‘आवारा पागल दिवाना’, “आंखें’, “मस्ती’ यासारख्या अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. तथापि, त्याने “मिस्टर इंडिया’ सारख्या सुपरहिट चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले आहे.