नवी मुंबई – महिलांची आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा चीनने कोरियाचा पराभव करत जिंकली. या स्पर्धेच्या अंतिम लढतीत चीनने कोरियावर 3-2 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. या स्पर्धेच्या इतिहासात चीनचे हे 9 वे विजेतेपद ठरले आहे.
सामन्याला प्रारंभ झाल्यावर कोरियाच्या संघाने या स्पर्धेचे पहिलेच विजेतेपद पटकावण्यासाठी अत्यंत आक्रमक खेळ केला. त्यांनी पहिले सत्र पूर्ण होण्यापूर्वीच चीनवर दोन गोल नोंदवले होते. मात्र, चीनने दुसऱ्या सत्रात पिछाडीवरून सरस खेळ केला व सलग तीन गोल करत केवळ एका गोलच्या फरकाने या सामन्यासह विजेतेपदही प्राप्त केले.
या स्पर्धेत चीनने कोरियावरील आपले वर्चस्व कायम राखताना आतापर्यंत झालेल्या सातही सामन्यांत विजय मिळवले आहेत. या स्पर्धेचे यजमानपद बारताकडे होते मात्र, त्यांना स्पर्धेत फारशी सरस कामगिरी करता आली नाही व त्यांचे आव्हान बाद फेरीपूर्वीच संपूष्टात आले होते.