पुणे – अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणातील आरोपी अॅड. प्रज्ञा कांबळे हिच्यावर मानसिक आजाराचे उपचार सुरू आहे, असा दावा तिच्या वकिलांनी केला आहे. त्यासंबंधीचे वैद्यकीय प्रमाणपत्र वकिलांनी न्यायालयात सादर केले आहे.
अमली पदार्थांची तस्करी आणि ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आहे आहेत. या दोन्ही गुन्ह्यांत ऍड. प्रज्ञा कांबळे हिला आरोपी करण्यात आले आहे. नाशिक पोलिसांनी प्रज्ञाला अटक केल्यानंतर पुणे पोलिसांनी तिचा ताबा घेतला आहे.
सध्या प्रज्ञा पोलीस कोठडीत आहे. तिला सुनावण्यात आलेल्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी (दि.7) संपत आहे. तिला न्यायालयात हजर केले जाणार आहे. मात्र, तत्पूर्वी, प्रज्ञाच्या वकिलांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. प्रज्ञा हिच्यावर पासून उपचार सुरू असल्याचे त्यात नमूद केले आहे.