BFI : ऑलिम्पिकपूर्वी भारतीय बॉक्सिंग फेडरेशनचा मोठा निर्णय..! ‘आयबीए’ची साथ सोडत जागतिक बॉक्सिंगमध्ये सामील, समोर आलं ‘हे’ कारण…

Boxing Federation of India : भारतीय बॉक्सिंग फेडरेशनने (BFI) शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशन (IBA) सोबतचे संबंध तोडले. यानंतर बीएफआय जागतिक बॉक्सिंगमध्ये सामील झाले. खरेतर, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने काही महिन्यांपूर्वी चेतावणी दिली होती की, जर राष्ट्रीय महासंघ आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनशी (IBA) संबंधित राहिले तर हा खेळ 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधून काढून टाकला जाऊ शकतो.
बीएफआयचे अध्यक्ष अजय सिंग म्हणाले, “बॉक्सिंगचा ऑलिम्पिक दर्जा टिकवून ठेवणे या खेळासाठी महत्त्वाचे आहे, त्यामुळे जागतिक बॉक्सिंगशी जोडले गेल्याने आम्हाला आनंद होत आहे.” सिंग म्हणाले की, “जगभरातील बॉक्सर्सना चांगले भविष्य मिळावे यासाठी आपण जागतिक बॉक्सिंग कार्यकारी मंडळासोबत या खेळाचा विकास करण्यासाठी काम करणार आहोत.”
Boxing World Olympic Qualifiers 2024 : बाॅक्सिंगपटू निशांत देवनं मिळवले पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट…
त्याच वेळी, आयबीए अध्यक्षपदाचे माजी दावेदार बोरिस व्हॅन डेर वोर्स्ट म्हणाले की, “आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगसाठी भारत हा एक अतिशय महत्त्वाचा देश आहे आणि आम्ही बीएफआय (BFI) चे जागतिक बॉक्सिंग कुटुंबात स्वागत करतो. हे एक अतिशय रोमांचक पाऊल आहे ज्यामुळे आशियामध्ये आमची उपस्थिती वाढेल. आम्ही आमच्या संयुक्त उद्दिष्टांसाठी बीएफआय (BFI) सोबत जवळून काम करू.”





