“आमची शेती आमची माणसे’, “आमचा व्यवसाय आमचे उत्पादन’ हा मूलमंत्र घेऊन वाशेरे गाव उद्योग नगरी करण्याचा लोकनियुक्त सरपंच संभाजीराजे कुडेकर यांचा प्रयत्न आहे. गावातील तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम समृद्ध झाला पाहिजे. “गावातील पैसा गावातच राहिला पाहिजे’, “बाहेरील पैसा गावात आला पाहिजे’ यासाठी नियोजनपूर्वक कार्यक्रम हाती घेतला आहे. सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून घराघरांत रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. 50 हजारांपुढे महिन्याला रोजगार मिळावा असे नियोजन केले आहे. सर्वांगीण विकासासाठी “धर्मनाथ फार्मर्स प्रोड्युसर’ची स्थापना केली आहे.
आमची शेती आमची माणसे, आमचा व्यवसाय आमचे उत्पादन हे ध्येय ठेवून “गावातील पैसा गावातच राहिला पाहिजे’ आणि “बाहेरचा पैसा गावात आला पाहिजे’ असे “मॉडेल’ बनविण्यात आले आहे. गावातील तरुणांना रोजगाराची संधी देण्याचा प्रयत्न आहे. गावातील नागरिक, कुटुंबे आर्थिकदृष्ट्या समृद्ध होण्यासाठी माझे प्रयत्न आहेत. त्या दृष्टीने गावातील आणि परिसरातील शेतकऱ्यांसाठी कंपनी स्थापन केली आहे. त्या माध्यमातून लवकरच शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण योजना सुरू करणार आहे. गावातील बचत गट आणि तरुण यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी काम सुरू आहे. रोजगाराच्या प्रवाहात ग्रामस्थांना आणण्याचा प्रयत्न आहे.
पाणीप्रश्नही लागला मार्गी
“हर घर जल हर घर नल’ या योजनेसाठी जलजीवन मिशनची मोठी योजना वाशेरे गावात मंजूर करून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. वर्षानु वर्षे वाशेरे गावाला टॅंकरने पाणीपुरवठा होत होता. महिलांना त्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती, त्यांच्या डोक्यावरचा हंडा जलजीवन पाणी योजना झाल्यानंतर उतरणार आहे. पाण्याचा सर्वांत मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे. गावात यापूर्वी अनेक पाणी योजना झाल्या; मात्र त्याचा गावासाठी उपयोग झाला नाही. चासकमान धरण, भामा आसखेड धरणातून मोठी पाणी योजना होण्यासाठी प्रयत्न केले आणि योगायोगाने शासनाने जलजीवन मिशन पाणी योजना केंद्र आणि राज्य शासनाने सुरू केली. त्याचा पाठपुरावा करून चासकमान धरणातून पाइपलाइन करून या योजनेचे काम सुरू आहे.
गावात चांगले रस्ते
गावात व वाड्या वस्त्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या 4 शाळा व अंगणवाड्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. गावाच्या विकासासाठी वाड्या-वस्त्यांना चांगले रस्ते केले आहेत. आता रोजगार उपलब्ध होणार असल्याने वाशेरे गावाचा विकास होईल.
छोटे-लघु बंधाऱ्यास मंजुरी
बाभणझुरा तलाव जमीन मोबदलासहीत व वाशेरे-साबुडीॅ 37 कोटींचा चळपीे खीीळसरींळेप ढरपज्ञ छोटे-लघु बंधारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली असून काम प्रोसेसमध्ये आहे. त्यासाठी माजी खासदार, शिवसेना उपनेते शिवाजी आढळराव पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
आढळरावांचे मिळतेय पाठबळ
गावाच्या विकासासाठी मी राजकारणात आलो गावातील ग्रामस्थांनी मला लोकनियुक्त सरपंच बनवले. त्यांच्यासाठी आता शेतकरी आम्ही उद्योजक हा केंद्रबिंदू ठेवून धर्मनाथ फार्मर्स प्रॉड्यूक्ट ही कंपनी स्थापन करून त्यांना आर्थिक सक्षम बनविण्याचा माझा दृष्टिकोन आहे. यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे पाठबळ मिळत असल्याचे लोकनियुक्त सरपंच कुडेकर यांनी सांगितले.
विकासाची गंगा
- चासकमान धरणातून जलजीवन मिशन योजना
- भोतेवाडी, चिमटेवाडी, पाटेवाडी, तळपेवस्ती चिमटेवस्ती, करवंदे वस्तीसाठी पेयजल योजना
- कडलगवाडी स्मशानभूमी बंधारा
- करवंदे वस्ती, कुडेकर मळा, भोतेवाडी अंतर्गत, भोतेवाडी ते स्मशानभूमी रस्ता, तळपेवस्ती भोतेवाडी, भोतेवाडी ते पाटेवाडी,
- काळेदरा, देशमुखवाडी, पाटेवाडी, धर्मनाथ मंदिर, कडलगवाडी, दलितवस्ती कॉंक्रिटीकरण
- भोतेवाडी स्मशानभूमी पत्राशेड
- कडलगवाडी, भोतेवाडी अंगणवाडी इमारत
- पाटेवाडी, भारतेवाडी सभामंडप
- भोतेवाडी-कडलगवाडी रस्ता डांबरीकरण
- भोतेवाडे शाळा दुरुस्ती, भारतेवाडी जिल्हा परिषद शाळा इमारत, भारतेवाडी पाणीपुरवठा योजना (तीनही कामे जानकीदेवी बजाज यांच्या सहभागातून)
- चिमटेवाडी विहीर खोलीकरण
- करवंदेवस्ती गणेश मंदिर सभामंडप
- करवंदेवस्ती पेव्हिंग ब्लॉक, सभामंडप
- कडलगवाडी माती बंधारा, भारतेवाडी वाजवणे रस्ता डांबारीकरण
- भारतेवाडी ठाकरवस्ती पाटेवाडी चिमटेवाडीसाठी पाणी टाकी (जानकीदेवी बजाज यांच्या सहभागातून)
- 25 कुटुंबाला 100 टक्के अनुदानावर गोबरगॅस प्रकल्प
- घरकुल योजना पूर्ण, ठाकरवस्ती समाज मंदिर
- धर्मराज मंदिरावर धर्मध्वज
- गोंदोबा मंदिर पत्रा शेड
- भोतेवाडी, करवंदेवस्ती सिमेंट बंधारा
- बामणझुरा पाझर तलाव
- वाशेरे साबुर्डी चुंडीचिदरी तलाव
- भोतेवाडी हनुमान मंदिर सभामंडप
- भोतेवाडी स्मशानभूमी, पाटेवाडी अंतर्गत मुरुमीकरण
- करवंदेवस्ती पानमंदवस्ती रस्ता खडीकरण
- काळचोंड पाझर तलाव विस्तारीकरण
- जिल्हा परिषद गावठाण शाळा शौचालय
- वाशेरे गावात पोस्ट ऑफिस केंद्र
- वाशेरे गावात प्रथमोपचार केंद्र
- 1990 साली वाड्या वस्त्यावर वीजपुरवठा
- मुंबई सेंट्रल ते कुडा पहिली एसटी सेवा
- कडलगवाडी 63 केव्हीची नवीन डीपी बसविली
“ग्रामीण आझादी’ देशासाठी “टॉप मॉडेल’
ग्रामीण भागात रोजगाराच्या अभावामुळे जिल्हा परिषद शाळा ओस पडत आहेत व मुंबई-पुणे सारखी शहरांची लोकसंख्या फुगत चालली आहे. खेड्यातील तरुणांमध्ये शेतीमधील टॅलेंटची कमी नाही. मात्र, त्यांना मार्गदर्शनाचा अभाव आहे. यावर मात करण्यासाठी सरपंच कुडेकर यांनी विडा उचलला आहे. त्यांनी “ग्रामीण आझादी’ असे खास देशासाठी “टॉप मॉडेल’ तयार केले आहे. त्यांनी “धर्मनाथ फार्मर्स प्रोड्युसर कंपनी’च्या माध्यमातून प्रत्येक सभासद कुटुंब, महिला बचत गट, नवतरुणांना प्रति महिना 50 हजार रुपये व त्यापेक्षा अधिक पैसे मिळतील असे उद्दिष्ट ठेवले आहे. शेतकरी असंघटित असल्यामुळे त्याला मार्केट मिळत नाही.
ग्रामीण भागातील शेतकऱ्याला मार्केटिंग जमत नसल्यामुळे सर्व नफा दलाल नावाचा बोका खाऊन जातो. त्यातून शेतकरी आर्थिक दुर्बल बनत आहे; मात्र, त्यावर या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यास आत्मनिर्भर बनविण्यात येत आहे. आत्मनिर्भर भारत, स्मार्ट कृषी नाबार्डच्या सहाय्याने ऍग्री बिझनेस, सबसीडी सहित प्रोजेक्टचा आधार घेऊन या शेतकऱ्यांच्या मालकीच्या कंपनीची स्थापना केली आहे. कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली “विकेल तेच पिकेल या धोरणाची अंमलबजावणी कंपनीच्या माध्यमातून केली जात असून शेतकऱ्यांना कृषी कौशल्य विकास, खरेदी/ विक्री व्यवस्थापन, खते, बियाणे, औषधे सवलतीच्या दरात व सेंद्रीय नैसर्गिक शेतीतून कसदार उत्पन्नाचे नियोजन याबाबत प्रशिक्षण, मार्गदर्शन केले जात आहे. आठवडे बाजाराचे नियोजन व शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी कंपनी जागतिक पातळीवर मार्केटिंग करीत आहे.
“धर्मनाथ फार्मर्स प्रोड्युसर’ कंपनीच्या माध्यमातून अल्पभूधारक, भूमिहिनांसाठी रोजगारनिर्मिती केली जात आहे. शेतीमालासाठी वखार निर्मितीचे नियोजन, सार्वजनिक औजार बॅंक, शेती उत्पादन वाढीसाठी शेती हंगामी करार पद्धती नियोजन, शेतीबांध, चराऊ पडीक राने, गवताची राने यामध्ये फळबाग निर्मितीला चालना मिळत आहे. शेतकरी सभासदांच्या आर्थिक सबलीकरणासाठी पतसंस्थेची निर्मिती करण्याचे नियोजन आहे. दरम्यान, “सोबत आलात तरच बनाल’, नाही तर आहे त्यापेक्षाही परिस्थिती बिकट पाहावयास मिळेल, असे शेतकऱ्यांना संभाजीराजे कुडेकर यांचे म्हणणे आहे.
संकलन : रामचंद्र सोनवणे, खेड तालुका प्रतिनिधी