नवी दिल्ली – अदानी विल्मर कंपनीचा 3,600 कोटी रुपयांचा आयपीओ पुढील आठवड्यात बाजारात येणार आहे. या आयपीओमधील शेअरची किंमत 218 ते 230 रुपये असल्याचे कंपनीने जाहीर केले.
27 जानेवारीपासून या शेअरसाठी नोंदणी करता येणार आहे. ही नोंदणी 31 जानेवारीपर्यंत चालेल. या आयपीओच्या माध्यमातून कंपनीने अगोदर 4,500 कोटी रुपये उभे करायचे ठरविले होते. मात्र नंतर बाजाराचा अंदाज घेऊन ही रक्कम कमी करून 3,600 कोटी रुपये इतकी केली आहे.
आयपीओमधून मिळालेल्या रकमेचा उपयोग कर्जाची परतफेड करणे आणि भांडवली गुंतवणुकीसाठी केला जाणार आहे. गुंतवणूकदारांना किमान 65 शेअर खरेदी करावे लागतील. या कंपनीची वार्षिक उलाढाल 37,195 कोटी रुपये असून आगामी काळामध्ये आक्रमक विस्तारीकरण करण्याचा कंपनीचा मनोदय असल्याचे कंपनीने या संदर्भातील माहिती जाहीर करताना सांगितले.