नवी दिल्ली – अमेरिका आणि कॅनडाच्या सीमेवर एका चिमुरडा आणि किशोरासमवेत चार भारतीयांचे मृतदेह कॅनडामध्ये अमेरिकेच्या सीमेलगत सापडले. या प्रकरणात फ्लोरिडा प्रांतातील एका व्यक्तीवर मानवी तस्करीचा आरोप ठेवण्यात आला आहे. या घटनेची दखल घेत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी कॅनडा आणि अमेरिकेतील दुतावासाला या घटनेला तातडीने प्रतिसाद देण्याचे आदेश दिले आहेत.
स्टिव्ह शॅंड (वय 47) याच्यावर सात भारतीय आणि हे मृतदेह सापडल्यानंतर मानवी तस्करीचा आरोप ठेवण्यात आला आहे, असे मिनसोटा येथील ऍटर्नीच्या कार्यालयाने स्पष्ट केले आहे. शॅंड याच्या अटकेनंतर दाखल केलेल्या आरोपपत्रात यातील एकाने कॅनडामध्ये बनावट व्हिसाच्या प्रकरणात खूप पैसे खर्च केल्याचे नमूद केले आहे. हा एक व्यापक मानवी तस्करीचा भाग असून त्यात शॅंड एक भाग असल्याचा आरोप केला आहे.
नॉर्थ डाकोटा येथे 15 प्रवासी क्षमता असणारे वाहन अमेरिका सीमा गस्ती पथकाने थांबवले. त्यावेळी त्यात दोन भारतीय होते, ते वाहन शॅंड चालवत होता. त्यावेळी त्याच्या सोबत दोन भारतीय होते. त्यावेळी पोलिसांना त्याच्या जवळपास भारतीय नागरिकांचा एक गट आढळला. त्यांनी या गोठवणाऱ्या थंडीत 11 तास चालत असल्याचे या आरोप पत्रात म्हटले आहे.
एका महिलेचा श्वास अनेकदा थांबत असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यासोबत आणखी एका व्यक्तीला दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्यांना सोडण्यात आले. या गटातील एका माणसाकडे लहान मुलांचे अन्न सापडले. त्याचा रात्री त्याच्यासोबत असणाऱ्या गटाशी चुकामुक झली होती. त्यामूळे त्याचे कुटूंबीय शोधण्यास सुरवात केली, असे पोलीस आयुक्त जेन मॅकलॅची यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्या म्हणाल्या, त्यावेळी सीमेपासून 10 मिटर अंतरावर एक पुरूष, दहा महिन्यांचे बाळ आणि एक महिला आढळली. तेथून थोड्या अंतरावर आणखी एका किशोरवयीन मृतदेह आढळला. हे सर्व मृत्यू कडाक्याच्या थंडीने झाले असण्याची शक्यता आहे.
या सर्व मृतदेहांवर उबदार कपडे होते. मात्र, ते त्यांच्या थंडीपासून संरक्षण करण्यास अपुरे होते. न संपणारी पायपीट, प्रचंड बर्फवृष्टी आणि पूर्ण अंधाराचे ते सामना करत होते. त्यात त्यांचा गोठून झालेला मृत्यू ही अत्यंत हृदयद्रावक घटना आहे, असे मॅकलॅची म्हणाल्या