मुंबई – अभिनेत्री सनी लिओनी तिच्या बोल्ड आणि हॉट लुकमुळे अधिक ओळखली जाते. अनेक हिंदी चित्रपट गाजवल्यानंतर तिने आता साऊथ सिनेसृष्टीत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच तिचा ‘कोटेशन गँग’ हा तमिळ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा टीझर तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. याला प्रेक्षकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळत आहे.
सनीने ‘कोटेशन गँग तामिळचा टीझर आता आऊट!!’ असं कॅप्शन लिहून हा टीझर शेअर केला आहे. अवघ्या काही वेळातच या टीझरला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले आहे. 2023 मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या केनेडी या चित्रपटात दमदार पदार्पण केल्यानंतर आता सनी एका नव्या तमिळ चित्रपटात दिसणार आहे. सध्या हा चित्रपट पाहण्यासाठी अनेकजण उत्सूक आहेत.
View this post on Instagram
या चित्रपटात सनी जॅकी श्रॉफसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ‘कोटेशन गँग’चे दिग्दर्शन आणि निर्माते विवेक कुमार कन्नन आहेत. हा तमिळबरोबरच हिंदी, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत देखील चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी ‘कोटेशन गँग’च्या ट्रेलरला देखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. हा एक थ्रिलर चित्रपट वाटतो. यातील सर्व पात्रांचे लूक देखील खूप भयंकर आहेत. चित्रपटाची कथा टोळीयुद्धाभोवती फिरणारी दिसते. मुंबई, चेन्नई आणि काश्मीरमध्ये पसरलेल्या वेगवेगळ्या टोळ्यांची ही कथा आहे. सनी लिओनीच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षक देखील उत्सुकतेने वाट पाहत आहेत.