मुंबई – सोनाक्षी सिन्हा प्रेमात पडली आहे. हे रिलेशनशीप तिने आतापर्यंत उघड केले नव्हते. अर्थात हे रिलेशनशीप बॉलीवूड गॉसिप कट्ट्यावर लपून राहू शकत नाही. हे रिलेशनशीप आता उघड होतेच आहे.
सलमान खानचा निकटवर्तीय बंटी सचदेवाबरोबर सोनाक्षीने सूत जमवले आहे. मात्र या दोघांपैकी कोणीही अद्याप या रिलेशनशीपवर शिक्कामोर्तब केलेले नाही. बंटी सचदेव ह सोहेल खानची पत्नी सीमा खानचा भाऊ आहे. विराट कोहलीचे मॅनेजमेंट बघणाऱ्या स्पोर्टस मॅनेजमेंट कंपनीत तो मालक आहे.
याशिवाय कन्सोटोन नावाची त्याची स्वतःची पीआर कंपनीही आहे. सोनाक्षी आणि बंटी नेहमीच बॉलीवूडच्या पार्ट्यांमध्ये एकत्र दिसत असतात. एका जुन्या इंटरव्ह्यूमध्ये सोनाक्षीने आपल्या बॉयफ्रेन्डचा ओझरता उल्लेख देखील केला होता.
तो एक सेल्फ मेड मॅन असल्याचे सोनाक्षी म्हणाली होती. गेल्या पाच वर्षात आपले केवळ एकच योग्य रिलेशनशीप असल्याचेही सोनाक्षी म्हणाली होती. पहिल्या रिलेशनशीपच्यावेळी ती केवळ
11-12 वर्षांची होती. पण आपल्या रिलेशनशीपमधून शिकणे आणि पुढे मार्गक्रमण करणेच महत्त्वाचे असते. असेही तिने सांगितले. आता ती लग्नाची घोषणा कधी करते हे बघूयात.