ayesha takia ।अभिनेत्री आयशा टाकिया ही बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. आयशाने ‘टारझन: द वंडर कार’मधून अभिनय विश्वात प्रवेश केला. मात्र अनेक चित्रपट करूनही काही काळानंतर चित्रपट जगतापासून तिने बर्क घेतला.
आयशा सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतीच ती विमानतळावर स्पॉट झाली होती, त्यानंतर लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. आता या तिने ट्रोल्सना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री आयेशा टाकिया आझमी विमानतळावर तिच्या मैत्रिणींसोबत दिसली. अभिनेत्रीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले आणि नेटिझन्सने सांगितले की,’ते तिला ओळखू शकत नाहीत. अनेक यूजर्सनी प्लॅस्टिक सर्जरीनंतर तिचा चेहरा खराब झाल्याचेही म्हटले.
सोशल मीडियावरील ट्रोलिंगनंतर, आयशाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या चाहत्यांसह आणि फॉलोअर्ससह एक नोट शेअर केली. तिचा चेहरा प्लास्टिकचा आहे, असे म्हणणाऱ्यांना तिने सडेतोड उत्तर दिले आहे.
अभिनेत्रीने एक मोनोक्रोम सेल्फी शेअर केला आणि लिहिले, “प्रेम आणि शांती.” आयशाने तिच्या कॅप्शनमध्ये एक इंस्टाग्राम पोस्ट देखील शेअर केली, ज्यामध्ये लिहिले आहे, “लोक तुम्हाला कसे समजतात हे तुम्ही नियंत्रित करू शकत नाही. तुम्ही काय करता किंवा बोलता ते त्या क्षणी ते काय करतात यावर आधारित आहे.” असं म्हणत तिने उत्तर दिले आहे.