गुरुग्राम (हरियाणा) – अभिनेता राजकुमार रावचे वडिल सत्यपाल यादव यांचे आज गुरुग्राममध्ये निधन झाले. ते ६० वर्षांचे होते.
मागील १७ दिवसांपासून त्यांच्यावर ‘मेदांता रूग्णालयात’ उपचार सुरू होते. अखेर गुरुवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आज सकाळी त्यांचे नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीमध्ये सत्यपाल यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.