मुंबई – साऊथचा सुपरस्टार प्रभास नुकताच ‘आदिपुरुष’ चित्रपटात दिसला. आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकणारा प्रभास सोशल मीडियावर हवा तितका ऍक्टिव्ह नसतो.चाहत्यांना केवळ आपल्या आगामी प्रोजेक्टबाबतची माहिती देण्यासाठी प्रभास सोशल मीडिया वापरात असल्याचे देखील बोलले जाते. म्हणुणच प्रभास अशा स्टार्सच्या यादीत सामील आहे जे त्यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन अगदी वेगळे ठेवतात.अशात प्रभासचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचं समोर आलं आहे.
27 जुलैच्या रात्री अभिनेत्याचे फेसबुक पेज हॅक करण्यात आलं होत. फेसबुक पेज हॅक केल्यानंतर हॅकर्सनी ‘अनलकी ह्युमन’ आणि ‘बॉल फेल अराउंड द वर्ल्ड’ असे दोन व्हायरल व्हिडिओ प्रभासच्या फेसबुकवरून शेअर केले होते. विशेष म्हणजे या गोष्टी शेअर झाल्यानंतर चाहते त्या सर्व पोस्टची मजा घेत होते. त्यानंतर अनेकांना प्रभासचे खाते हॅक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोस्टवर ताशा कमेंट करायला सुरुवात केली.
फेसबुकबाबतची ही बाब प्रभासच्या देखील लक्षात येताच त्याने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत याबाबत सर्वांना सुचला दिली.”सर्वांना हाय, माझ्या फेसबुक पेजशी ‘छेडछाड’ झाली आहे. माझी टीम सर्व पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहे” अशी माहिती प्रभासने इंस्टाग्रामवरून सर्वांना दिली.
हॅकिंगची माहिती मिळताच प्रभासच्या टीमने कारवाई सुरु केली.प्रभासला फेसबुकवर 24 मिलियनहुन अधिक फॉलोअर्स आहेत.बाहुबलीनंतर प्रभासाचे वर्ल्ड वाईड चाहते आहेत. प्रभास लवकरच अॅक्शन-थ्रिलर सालार पार्ट 1 मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. श्रुती हसन आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या प्रमुख भूमिका हा चित्रपट २८ सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.