मुंबई – मराठी आणि हिंदी चित्रपटातील सतत चर्चेत असणारे ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे करोनाने निधन झाले आहे. अभिनेते किशोर यांना करोनाची लागण झाली होती. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना ठाणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना आज (ता.20, मंगळवार) दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान अखेरचा श्वास घेतला.
अभिनेते गोविंदा यांच्या ‘जिस देश में गंगा रहता है’ चित्रपटातील त्यांनी साकारलेले सन्नाटा हे पात्र विशेष गाजले होते.