देहूगाव – तीर्थक्षेत्र देहूतील इंद्रायणी नदी पात्रातील वसंत बंधारा जवळ वाळू उपसा करणाऱ्यांवर गुरूवारी (दि. २५) पहाटे चारच्या सुमारास हवेलीचे अप्पर तहसीलदार गीता गायकवाड यांच्या नेतृत्वात महसूल विभागाची कारवाई करण्यात आली.
यावेळी नायब तहसीलदार प्रवीण ढमाले, गणेश सोमवंशी, तलाठी अतुल गीते, पोलीस पाटील सुभाष चव्हाण, चंद्रसेन टिळेकर, कोतवाल संभाजी मुसूडगे आदी उपस्थित होते.
देहूतील इंद्रायणी नदी पत्रामध्ये वसंत बंधारा जवळ वाळू उपसा होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाल्यानंतर गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास पथकाने कारवाई करत घटना स्थळा वरून २ ट्रॅक्टरच्या ट्रॉली सह २ वाळूच्या चाळण्या, १ फोकलॅड जप्त केले आहे. सर्वांची माहिती मिळताच चालक, मजूर वाहने सोडून पळून गेले. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे .