कोविड केअर सेंटरमध्ये चोरीचा प्रयत्न; येरवड्यात अल्पवयीन मुलांना पकडले

कात्रज – करोना बाधीतांची संख्या वाढत असल्याने शहर तसेच उपनगरांमध्ये कोविड केअर सेंटर सुरू होत आहेत. परंतु, भुरट्या चोरट्यांकडून आता अशा केंद्रातील साहित्यावर डल्ला मारला जात आहे. कोंढवा-येवलेवाडी कार्यालयाच्या हद्दीतील कोविड केअर सेंटरमधील संगणकाच्या चोरीच्या प्रयत्नात साहित्याची मोडतोड झाल्याने कामकाजात अडथळा निर्माण झाला, यामुळे रुग्ण तपासणीचे काम काही वेळ बंद ठेवावे लागले.

सुरक्षारक्षकाने प्रसंगावधान राखल्याने चोरीचा प्रयत्न फसला. परंतु, दोघे चोरटे अल्पवयीन असल्याने त्यांना समज देऊन सोडून देण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मदन बिरादार यांनी सांगितले.

महानगरपालिकेच्या कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत स्व. राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाजवळ असलेल्या वाहनतळ येथील महापालिकेचे करोना स्वॅब सेंटरमध्ये रात्री दीड वाजण्याच्या सुमारास वाहनतळाच्या जिन्यावरून सेंटरमध्ये घुसून दोन अल्पवयीन मुलांनी कॉम्प्युटर चोरण्याचा प्रयत्न केला.

सुरक्षारक्षकाने प्रसंगावधान ठेवून या दोन मुलांना रंगेहात पकडले, त्यामुळे होणारे नुकसान टळले. परंतु, साहित्याची मोडतोड झाल्याचे कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. मदन बिरादार यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.